🕒 1 min read
कोलकाता : जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपक्ष आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसच्या विचारसरणीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. कन्हैया म्हणाले, देशाला वाचवण्यासाठी सर्वात जुना पक्ष बळकट करणे आवश्यक आहे.
कन्हैया कुमार यांच्या पक्ष प्रवेशावर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडला तर मी फक्त त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो’, असे वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या भवानीपूर येथे ते बोलत होते.
"If someone comes out of the gutter and falls into the drain, then I can only sympathise with him," BJP National General Secy Kailash Vijayvargiya respond to the former CPI leader Kanhaiya Kumar joining the Congress (28.09) pic.twitter.com/lZryf1wamK
— ANI (@ANI) September 29, 2021
तर कम्युनिस्ट पार्टीला रामराम ठोकल्यानंतर सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनीही कन्हैयाकुमार यांच्यावर टीका केली आहे. ‘कन्हैया कुमारने स्वतःला माझ्या पक्षातून बाहेर काढले. सीपीआय जातिहीन, वर्गहीन समाजासाठी लढत आहे. त्यांच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि ध्येय नक्कीच असतील. कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारसरणीवर त्याचा विश्वास नसल्याचे यावरून दिसून येते’, अशी टीका डी राजा यांनी केली आहे.
कन्हैया कुमारने काँग्रेससोबत आपली नवीन राजकीय खेळी सुरू केली आहे. कन्हैय्या कुमार २०२१च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये सामील झाले होते. बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून भाजपाचे गिरीराज सिंह यांच्या विरुद्ध लढताना त्यांना त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या पक्षप्रवेशानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- ‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
