Share

इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सर्वपक्षीय नेते  दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षात येणार असल्याचा दावा करत आहेत. भाजप शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या चारही पक्षातील नेते अगदी छातीठोकपणे हा दावा करताना दिसून येतात. विशेष म्हणजे या चारही पक्षातील नेते पूर्ण जोर लावून एकमेकांचे नेते फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात मात्र सर्वांनाच म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

काल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धुळ्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा हा दावा केला ते म्हणाले, भारतीय जनता पक्षातील अनेक आजी माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले ते भाजपात गेले असले तरी मनाने ते काँग्रेसचे आहेत त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत आहेत असे ते म्हणाले.

दरम्यान,दुसऱ्या बाजूला भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते देखील अशाच पद्धतीचे दावे करत असतात. जर खरंच दुसऱ्या पक्षातील नेते या पक्षात जाण्यासाठी इच्छुक असतील तर ते नेते नेमके कशाची वाट पाहत आहेत हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे. एकतर या सर्वच पक्षातील नेते धूळफेक करत आहेत किंवा पक्षात प्रवेश करणरे नेते एखाद्या योग्य संधीची वाट पाहत असावेत या दोनच शक्यता असू शकतात असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

आता बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडू शकतो की योग्य संधी म्हणजे नेमकं काय ? तर याच विश्लेषण थोडक्यात करायचे झाल्यास कोणतीही मोठी निवडणूक जवळ नसल्याने हे नेते सध्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून बसलेले असू शकतात.याशिवाय राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या प्रचंड गोंधळाची असल्याने नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करावा या द्विधा मनस्थितीत सुद्धा अडकलेले असू शकतात.

सरकार कधीही पडू शकते अशा अफवा अधूनमधून उठवल्या जातात या नेमक्या कोण उठवत असेल हा वेगळा विषय असला तरीही या अफवांमुळेच राजकीय पक्षप्रवेश करणे चाणाक्ष नेत्यांनी थांबविले असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच खडसे आणि अन्य काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाशिवाय दुसरे कोणतेही महत्वाचे पक्षप्रवेश होताना दिसून येत नाहीयेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!