🕒 1 min read
मुंबई: गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून काँग्रेस नेतृत्वावर अनेक सवाल केले आहेत.
पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाला काही सवाल केले. ‘‘मी पंजाब आणि राष्ट्रहिताचेच बोलत होतो, पण त्यावर काँग्रेसने मला ‘नोटीस’ देऊन काय साध्य केले?’’ हा त्यांचा मुख्य सवाल आहे. काँग्रेसने माझा राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाखड करतात. असा उल्लेख संजय राऊत यांनी अग्रलेखात केला आहे.
माधवराव शिंदे, जीतेंद्र प्रसाद व बलराम जाखड या तीनही नेत्यांना काँग्रेसने भरभरून दिले. त्यांच्या मुलांचेही कल्याण करण्यात काँग्रेसने कधी हात आखडता घेतला नाही. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद व सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठ्या निघाल्या. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी काँग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल. तरुणांना काँग्रेस पक्षात आपले भविष्य दिसत नसेल तर कसे व्हायचे? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
- “फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी पुणे…”, ‘मनसे’चा इशारा
- “…वेळ आपल्या देशावर आलेली नाही याचं सर्व श्रेय बाबासाहेबांना जातं”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- “मी मुख्यमंत्री असताना डॉ. आंबेडकरांचे…”, शरद पवारांनी सांगितली ‘तो’ प्रसंग
- “…ह्यापुढे होता कामा नाही”, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड संतापले
- IPL 2022 RCB vs GT : चाहते म्हणतायत…तेरा बाप आया! विराटच्या खेळीचं सोशल मीडियावर धडाकेबाज सेलिब्रेशन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
