🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.
“गुढीपाडवा मेळाव्यातील राजगर्जनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सैरभैर होऊन वाट्टेल ते बरळू लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यातील उत्तरसभा झाली, मग अनधिकृत भोंग्यांचा माज उतरवण्यासाठी संभाजीनगरची प्रचंड सभा आणि आता फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी, पुणे! “, असे ट्वीट राजू पाटील यांनी केले आहे.
गुढीपाडवा मेळाव्यातील राजगर्जनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सैरभैर होऊन वाट्टेल ते बरळू लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यातील उत्तरसभा झाली, मग अनधिकृत भोंग्यांचा माज उतरवण्यासाठी संभाजीनगरची प्रचंड सभा आणि आता फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी, पुणे !#MNS pic.twitter.com/gRYNWfifYv
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 21, 2022
दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा तूर्तास रद्द केला असून आता ते पुण्यातील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…वेळ आपल्या देशावर आलेली नाही याचं सर्व श्रेय बाबासाहेबांना जातं”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- “मी मुख्यमंत्री असताना डॉ. आंबेडकरांचे…”, शरद पवारांनी सांगितली ‘तो’ प्रसंग
- “…ह्यापुढे होता कामा नाही”, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड संतापले
- IPL 2022 RCB vs GT : चाहते म्हणतायत…तेरा बाप आया! विराटच्या खेळीचं सोशल मीडियावर धडाकेबाज सेलिब्रेशन
- IPL 2022 RR vs CSK : चेन्नईला हरवत राजस्थानची दुसऱ्या स्थानी झेप; जयस्वाल, अश्विनची झुंजार फलंदाजी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

