Share

“…वेळ आपल्या देशावर आलेली नाही याचं सर्व श्रेय बाबासाहेबांना जातं”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख ॲड. जयदेव गायकवाड यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंतांचा संघर्ष या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शरद पवारांनी (sharad pawar) सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत मोठे वक्तव्य केले.

“बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे आपल्या देशाला स्थैर्य मिळालं. आज श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहात आहोत. मात्र तशी वेळ आपल्या देशावर आलेली नाही आणि यापुढेही येणार नाही. याचं सर्व श्रेय हे बाबासाहेबांना जातं.”, असे शरद पवार यांनी म्हटले.

कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन अर्थशास्त्र विद्यापीठात तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा पाहू शकता. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दि सिम्बॉल ऑफ नॉलेज’, असे त्या पुतळ्याखाली लिहीले आहे. माझ्या मते देशातील एखाद्या व्यक्तीचा देशाबाहेर इतका मोठा सन्मान झालेला नाही. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन ही एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती. असेही शरद पवार यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!