🕒 1 min read
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या प्रकरणातील संशयिताना पडकण्यात आलं. मात्र, अद्याप सूत्रधार कोण आहे. हे समजू शकले नाही. त्यांना कधी पकडणार? असा सवाल अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी सरकारला केला आहे. तसेच सीबीआयने हा खटला न्यायालयात लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी अंनिसचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, अरुण बुरुंडे, श्रीपाल लालवाणी हे उपस्थित होते.
डॉ. हमीद म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरुद्ध अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉक्टर वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुढील तपास होऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी २०१० मध्ये झालेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण


