Share

भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०२२ ची महानगरपालिका निवडणूक जस-जशी जवळ येत चाललीये तसे-तसे विविध पक्ष आपआपले कार्य जनतेपर्यंत कसे पोहोचेल यासाठी वेगवेगळ्या रणनितीचा वापर करताना दिसत आहेत. तसेच निवडणुकीच्या अनुशंगाने जनतेशी संवाद साधता यावा याकरिता मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक नवीन माहिती दिली आहे.

दिनांक १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेले चांगले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी जनाशिर्वाद यात्रेद्वारे महाराष्ट्रातील केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे चारही नवीन नेते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र, या यात्रेचा उद्देश फक्त जनतेपर्यंत पोहोचणे नसून आघाडी सरकार विरोधात टीकांचा वर्षाव करणे हा देखील आहे. त्यामुळे भाजपाकडून या यात्रेमार्फत ‘एक तीरसे दो निशाणे’ मारण्यात येणार आहे.

कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटरची यात्रा काढतील. याच काळात डॉ. भारती पवार या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ४३१ किलोमीटरची यात्रा काढतील. डॉ. भागवत कराड मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा २५ ऑगस्टपर्यंत ६५० किलोमीटरचा प्रवास करेल. भागवत कराड हे मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल.

जनतेशी जवळीकता
निवडणूक जवळ येताच जनतेला डोक्यावर उचलून घेण्याची रीत आपण वर्षानुवर्षे बघत आलो आहोत. निवडणुकीच्या या काळात जनतेशी जवळीकता वाढवून मत मिळविण्याचा प्रत्येकाचा उद्देश असतो. यासाठी सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांना आत्तापर्यंत आपण केलेले कार्य किती चांगले आहे हे पटवून दिले जाते. तसेच आपला मोठेपणा सांगत संधी साधत विरोधकांवर देखील टिकास्त्राचा प्रहार केला जातो. त्यामुळे यंदाही याच संकल्पनेचा उपयोग होतानाचे पुर्वलक्षण दिसून येत आहे.

दरम्यान, यंदाची निवडणुक काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विविध पक्षांमधील चढाओढ आपल्याच बघायला मिळणार आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत कोण जिंकून येईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!