सांगली : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी भाजप नेते गोपीचंद पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी १ लाख ११ हजार रुपयांचे जाहीर केले आहे.
गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव -माणसांच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल. देशी दुभते-दुधाळ जनावरं पाहायचे असतील, येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल, तर गोवंश टिकवावा लागेल. गोवंश वाढवावा लागेल. यासाठी आपल्या ग्रामीण व्यवस्थेत एक आधीपासूनच pic.twitter.com/wdhlkNtCyU
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) August 14, 2021
‘गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव -माणसांच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल. देशी दुभते-दुधाळ जनावरं पाहायचे असतील, येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल, तर गोवंश टिकवावा लागेल. गोवंश वाढवावा लागेल. यासाठी आपल्या ग्रामीण व्यवस्थेत एक आधीपासूनच नाही का?’
‘शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा,शेतीमाती साठी एकत्र यावं लागणार आहे.. त्यामुळेच मी भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे दि. २० ॲागस्ट रोजी आयोजन केले आहे. तुमचं माझ्या गावी झरे, ता.आटपाडी, जि. सांगली येथे स्वागत आहे. या गोवंशाच्या आस्तित्वासाठी आणि शेतकरी आस्मितेसाठी आपल्याला लढा द्यायचायं’ असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.
दरम्यान, पेटा संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती थांबल्या आहेत. तेव्हा पासून शेतकरी या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी धडपड करत आहेत. परंतु राज्य शासनाने शर्यती सुरु करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यत संघटना आता आक्रमक झाली आहे.
२०१४ ला बंद पडलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात त्यावर सुनावणीच झालेली नाही. ती होण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, यासाठी विविध संघटनेच्या वतीने आमदार,खासदारांना निवेदने देण्यास सुरवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

