🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा लस आणि बेरोजगारीच्या मुद्दावरून मोदी सरकारवर निशाना साधला. कोरोनाच्या संकट काळात सरकार लोकांना लस व रोजगार उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. यासोबतच कोरोना लढ्यासाठी विदेशातून आलेल्या निधीचे काय झाले असा सवालही राहुल यांनी सरकारला विचारला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात निर्माण झालेल्या बिकिट स्थितीवरून राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. लोक कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडले आहेत. लोकांना लस आणि रोजगार देखील मिळत नाही. सरकार या सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था देखरेख केंद्र अर्थात सीएमआयईने जारी केलेल्या आकडेवारीचा स्कीनशॉट जोडला आहे.
ना वैक्सीन, ना रोज़गार,
जनता झेले कोरोना की मार,
बिलकुल फ़ेल मोदी सरकार! pic.twitter.com/8bnB85VEdY— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2021
यामध्ये एप्रिल महिन्यात ७५ लाख लोकांचा नोकरी गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. बेरोजगारीचा दर चार महिन्यातील उच्चांक स्तरावर पोहल्याचे सीएमआयने म्हटले आहे. कोरोना संकट हाताळण्यावरून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करणाऱ्या राहुल गांधींनी विदेशातून मिळालेल्या निधींवरुनही सवाल उपस्थित केला आहे. अन्य एका ट्विटमध्ये राहुल यांनी मोदी सरकारला पाच सवाल विचारले आहेत.
Questions about Covid foreign aid:
– What all supplies has India received?
– Where are they?
– Who is benefitting from them?
– How are they allocated to states?
– Why no transparency?Any answers, GOI?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2021
आतापर्यंत विदेशातून कोणकोणत्या प्रकारची मदत मिळाली?, ती मदत गेली कुठे?, त्या मदतीचा फायदा कुणाला झाला?, त्या मदतीचा राज्यांना कसा पुरवठा केला गेला?, या सगळ्यात प्रक्रियेत पारदर्शकता का नाही?, असे पाच सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सुत्रे हाती घेताच ममतांकडून बंगालमध्ये कठोर निर्बंध
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
