बीड: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सध्या राबवल्या जात आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे राज्यभरात लागू केलेली संचारबंदी. या संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस दंड ठोठावत आहेत तसेच अनेक ठिकाणी पोलीस लाठीचा वापर देखील करत आहेत. मात्र कोणतीही खात्री न करता मारहाण करणे हे योग्य नाही.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही कोणतीही खात्री न करता त्यांनाही मारहाण करणे, अडवून दंड करण्याचे प्रकार होत आहेत. बुधवारी माळीवेस चौकात डीवायएसपी संतोष वाळके यांनी खासगी रुग्णालयातील चैतन्य शहाणे व विठ्ठल क्षीरसागर या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याबाबत आयएमएने एसपी आर. राजा यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच आष्टी तालुक्यात टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाही पोलिसांनी बेदम मारहाण केली. यामुळे डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.
जिल्ह्यात सध्या विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिस मारहाण करत आहे, विनाहेल्मेट वाल्यांना दंड ठोठावला जात आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यापूर्वी काही डॉक्टरांना पोलिसांनी दंड ठोठावत अर्वाच्च भाषा वापरली होती, त्यानंतर सरकारी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनाही दंड ठोठावला होता. बुधवारी माळीवेस चौकात पोलिस उपअधीक्षक वाळके यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. अंमलबजावणीच्या नावाखाली पोलिस आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याने आयएमएने संतप्त भावना व्यक्त केल्या. एससपींना निवेदन दिल्याची माहिती अध्यक्ष अनुराग पांगरीकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान
- मोठी बातमी : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन
- आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने निराश महिला क्रिकेटपटुला सीएसकेने दिली ही ‘भेट’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

