Share

आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल

Published On: 

जोधपूर – देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून आता या विषाणूच्या विळख्यात आसाराम बापू देखील अडकला आहे. राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यामुळे महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सध्या जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना संसर्गामुळे आसाराम बापूची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूंना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी आसारामची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू जोधपूर तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. ऑगस्ट 2013 मध्ये आसारामने जोधपूरजवळील मनाई भागात एका अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचे बळी बनविले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!