मुंबई : मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत अनेकांना उत्सुकता त्यानुसार याबाबतचा निर्णय देण्यात आला असून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सुचवलेल्या बाबी रद्द करण्यात आल्या आहेत. आरक्षण हे ५० टक्क्यांच्या वर जाऊ शकत नसल्यांचं यावेळी सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
यादरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचा निकालाबाबत ट्विट करत आपल मत मांडलं आहे. केदार शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘आजचा मराठा आरक्षणाबद्दलचा सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!’
आजचा #मराठा_आरक्षण बद्दल #supremecourtofindia चा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) May 5, 2021
दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच निर्भिड आणि स्पष्टपणे मांडत असतात. काही दिसांपूर्वीच त्यांनी कोरोनाच्या संकटात घेतल्या जाणाऱ्या आयपीएल मॅचेस आणि राजकीय सभा यावर बोलले होते. आता त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय आणि मराठी भाषेचा अभिजात दर्जा यावर मत व्यक्त केल आहे. केदार शिंदे त्यांच्या चित्रपटांमधून देखील एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या याच वेगळेपणामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
महत्वाच्या बातम्या
- अदर पुनावालांना ‘Z प्लस’ सिक्यूरिटी द्यावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान


