🕒 1 min read
बीड: जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. नव्या रुग्णांची होणारी वाढ पाहता जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता अनेक ठिकाणी आता कोविद केअर सेंटर देखील सुरु करण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी येथील स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असली तरी रुग्णांची वाढ होतच आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून बुधवारी (दि.५) नव्या १४३९ रुग्णांची नोंद झाली. यातली चांगली बातमी अशी की कोरोना वर एक हजार १४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार १९२ जणांची कोरोना चाचणी केली होती. यापैकी २ हजार ७५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १४३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३२८ रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात २८०, आष्टी ७१, धारूर ६८, गेवराई १३०, केज १५०, माजलगाव ७०, परळी १२७, पाटोदा ३८, शिरूर १३८ व वडवणी तालुक्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी ११४० जण कोरोनामुक्त झाले. आता रुग्णसंख्या ६१ हजार ६२ झाली असून आतापर्यंत ५३ हजार ३११ जण कोरोनामुक्त झालेत. सध्या ६,७३६ जण कोरोनाशी झुंज देत असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान
- मोठी बातमी : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन
- ‘बाबा लवकर बरे व्हा’, सुपरमॅनचे चित्र काढत चिमुकलीनं कोव्हिड विरुद्ध लढण्यासाठी दिलं बळ
- आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने निराश महिला क्रिकेटपटुला सीएसकेने दिली ही ‘भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
