कोलकाता : सत्तेची सूत्रे हाती घेताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले सर्वाधिक प्राधान्य कोरोनाविरोधी लढ्याला असेल, असे स्पष्ट केलेय. त्यांनी राज्यात काही कठोर निर्बंध लागू केले. त्यानुसार राज्यातील लोकल रेल्वेसेवा पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
राजभवनावर आयोजित छोटेखानी सोहळ्यात ममतांनी बुधवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण येथून थेट सचिवालयात जाऊन कोरोनासंदर्भात बैठक घेणार असल्याचे सांगितले. ममतांनी एकटीनेच शपथ घेतली असल्याने इतर कोणीही नेते बैठकीसाठी उपस्थित नव्हते.
त्यांनी घेतलेल्या निर्णयानूसार, मेट्रो रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळाची वाहतूक सेवा ५० टक्क्यांनी घटवण्यात आली आहे. राज्यात येणाऱ्या विमान प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आला आहे. हा चाचणीचा रिपोर्ट ७२ तासांच्या आतील हवा. इतर राज्यांमधून रस्ते आणि रेल्वेमार्गाने येणाऱ्या लोकांसाठीही आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असेल, ममतांनी सांगितले.
राज्य सरकारने खासगी संस्थांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. राज्यातील सर्व बँकांची कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील शॉपिंग मॉल्स, केश कर्तनालय, बार, रेस्टॉरंट, जिम, स्वीमिंग पूल पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान


