Share

एनआयएने वाझेंच्या विरोधात ज्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला तो UAPA हा कायदा नेमका आहे तरी काय ?

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेकडून (NIA) निलंबित API सचिन वाझे याच्यावर आता एनआयएकडून UAPA (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. एनआयएने वाझेंविरोधात UAPA ची कलम 16 आणि 18 लावली आहेत. त्यामुळे वाझेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

UAPA हा कायदा सहसा दहशतवाद्यांवर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणाऱ्यांवर लावला जातो. यामुळे आता सचिन वाझे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग करण्यात यावा असा आदेश ठाणे न्यायालयाने दिला आहे. मुकेश अंबानी यांच्याघराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडेच आहे. ठाणे न्यायालयाच्या आदेशानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही NIA कडे गेला आहे.

UAPA हा कायदा नेमका आहे तरी काय ?

युएपीए हा एक दहशतवादविरोधी कायदा आहे. दहशतवादाच्या विरोधात १९६७ साली यूएपीए हा कायदा करण्यात आला होता. या कायद्यात एखादी संस्था व संघटनेला दहशतवादी घोषित करण्याची तरतूद होती. कुठल्याही व्यक्तीला दहशतवादी घोषित करता येत नव्हते. दहशतवादाला चिथावणी देणारे त्याचा फायदा उचलत होते. त्यांना चाप लावण्यासाठी सरकारनं गेल्यावर्षी या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करण्यात आले.

यानुसार एका व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याची तरतूद दुरुस्ती विधेयकात करण्यात आली आहे.अनेक अतिरेकी, नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्यांवर या कायद्याअंतर्गत खटले दाखल केले जातात. याआधी युएपीए कायद्यामध्ये पाच वेळा दुरूस्ती करण्यात आली आहे.या कायद्याच्या सेक्शन 35 आणि 36 नुसार सरकार कोणत्याही मार्गदर्शक सूचनांशिवाय, कोणत्याही निर्धारित प्रक्रियेचं पालन न करता कोणत्याही व्यक्तीला कट्टरपंथी जाहीर करू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!