औरंगाबाद : उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हजरत निझामुद्दीन – हुजूर साहिब नांदेड – हजरत निझामुद्दीन दरम्यान होळी उत्सव सुपर फास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान या मध्ये (गाडी क्रमांक ०४०३८) हि विशेष रेल्वे हजरत निझामुद्दीन येथून गुरुवारी (दि. २५) मार्च आणि १ एप्रिल रोजी गुरुवारी रात्री ११ वाजून १५ मिनिटाने सुटणार आहे. तर भोपाल, अकोला मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ती रात्री ९ वाजून ४० मिनिटाने पोहोचणार आहे. तसेच (गाडी क्रमांक ०४०३९) हि विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड येथून शनिवारी (दि. २७) आणि ३ एप्रिल रोजी शनिवारी सकाळी ११ वाजून ५ मिनिटाने सुटणार आहे. तसेच अकोला, भोपाल मार्गे हजरत निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून १० मिनिटाने पोहोचणार आहे.
नांदेड – बंगळुरू, ओखा – रामेश्वर विशेष रेल्वेला मुदतवाढ
बंगळुरू – नांदेड – बंगळुरू नांदेड उत्सव विशेष गाडी आणि ओखा – रामेश्वर- ओखा उत्सव विशेष रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सुरु केली आहे. या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. (गाडी क्रमांक ०६५१९) बंगळुरू ते हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष गाडीस ३० मार्च ते ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तसेच (गाडी क्रमांक ०६५२०) हुजूर साहिब नांदेड ते बंगळुरू उत्सव विशेष गाडीस १ एप्रिल ते १ जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ( गाडी क्रमांक ०६७३३) रामेश्वर – ओखा ही साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेसला २ एप्रिल ते २५ जून दरम्यान १३ फेऱ्यांची मुदत वाढ देखील देण्यात आलेली आहे. (गाडी क्रमांक ०६७३४) ओखा – रामेश्वर साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेस ला ६ एप्रिल ते २९ जून दरम्यान १३ फेऱ्यांची मुदत वाढ पण देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वे विभागाचा मनमानी कारभार, हैद्राबाद-हडपसर रेल्वे कायमची बंद
- वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात थोडं खरं बोलायला शिका; अमृता फडणवीसांचा पुन्हा प्रहार
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- आणखीन एक बदली प्रकरण, औरंगाबादच्या निलंबित कारागृह अधीक्षकाने मागितले इच्छामरण


