Share

एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी

Published On: 

पुणे : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामीवीर शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावत सर्वाधीक ९८ धावा केल्या. शिखरचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. भारतीय संघात मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या सलामीवीर शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक पूर्ण करण्यात अपयश आले. एकदिवसीय सामन्यांत धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे.

शिखर-रोहित या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र अडखळत खेळणारा रोहित २८ धावावर असताना स्टोकस् च्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर धवनने कर्णधार कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. तसेच आक्रमक फलंदाजी करत त्याने शतकाचीही संधी निर्माण केली. मात्र, बेन स्टोक्‍सच्या स्लोअरवन चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनकडे त्याने सोपा झेल दिला व बाद झाला.

त्याने आपल्या 105 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार फटकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन सहा वेळा नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धचा हा सामना धवनच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 140 वा सामना होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!