🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारनं ‘सहकारातून समृद्धी’ या दृष्टीने सरकारनं सहकार मंत्रालयाची (मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन) स्थापना केली आहे. हे मंत्रालय देशातील सहकार्यासाठी प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट मजबूत करण्याच्या दृष्टीनं काम करणार आहे असं सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सहकारातून समृद्धीचं आपलं व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. हा निर्णय सहकारी क्षेत्र आणि या क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंना सक्षम करण्यासाठी मदत करेल. भारताच्या सहकारी क्षेत्राला नवीन उंचीवर नेईल असा विश्वास मोदी सरकारला वाटत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावेळी या मंत्रालयाची घोषणा केली होती. यानुसार सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे.देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर बाबी आणि धोरणात्मक चौकट निर्माण करण्याचं काम सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत केले जाणार आहे. देशात अनेक ठिकाणी सहकार चळवळीने आर्थिक विकासाचे मॉडेल तयार केले आहे.
सहकार चळवळीतील प्रत्येक सदस्य जबाबदारीच्या भावनेने काम करतो. सहकारी संस्थांना व्यवसायाची सुलभता (इज ऑ फ डूईंग बिझनेस) प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि बहु-राज्य सहकारी (एमएससीएस) विकासास सक्षम करण्याचे काम या मंत्रालयाकडून होणार आहे.देशात सहकारावर आधारित आर्थिक विकास मॉडेलचा संबंध आहे. या मॉडेलमध्ये प्रत्येक सदस्य जबाबदारीने काम करतो. तसेच मंत्रालयाकडून सहकारी संस्थांना व्यवसाय सुलभता म्हणजे ईज ऑफ डुइंग बिजनेसची प्रक्रिया सोपी करते. तसंच मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्हच्या (एसएससीएस) विकासासाठी काम करेल असा विश्वास सरकारला वाटत आहे म्हणूनच या नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात येत आहे.
देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचं काम हे मंत्रालय करणार आहे. दरम्यान, या मंत्रालयासाठी मंत्रिपदाची नियुक्ती देखील मंत्रिमंडळ विस्तारात केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशाचं केंद्रीय सहकार मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार याबाबत चर्चा आता सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
