Share

सोप्या शब्दात जाणून घ्या टूलकिट म्हणजे नेमकं काय ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : जवळ जवळ तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे.

२६ जानेवारी रोजी आंदोलकांनी धुडगूस घातल्यानंतर या आंदोलनाची दिशा बदलली. दिल्ली हिंसाचाराचा संबंध या पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या एका टि्वटशी देखील जोडण्यात  येत आहे. या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होते. यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे.

भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या टूलकिटमध्ये म्हटले होते.

यानंतर अचानकच टूलकिट हा शब्द ऐकू येऊ लागला. ग्रेटा थनबर्ग यांच्या एका टि्वटनंतर हा शब्द जास्तच  प्रचलित झाला.यानंतर या टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 फेब्रुवारी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शनिवारी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिशा रवी हिला सुद्धा अटक केली आहे. चौकशी दरम्यान दिशाने आपण टूलकिटमध्ये बदल करुन व्हायरल केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच अनेकांना हे टूलकिट म्हणजे नेमके असते तरी काय असा प्रश्न सध्या पडला आहे.

टूलकिट म्हणजे काय?
टूलकिट म्हणजे एक दस्ताऐवज असतो. एखाद्या मुद्याची माहिती देणारे आणि त्यावर कृती करण्याबाबतची सविस्तर त्यात माहिती असते. कुठल्याही मोठ्या आंदोलनावेळी टूलकिट शेअर केले जाते. आंदोलनावेळी पाठिंबा कसा वाढवायचा, कुठले हॅशटॅग वापरायचे, आंदोलनावेळी काही अडचण आली तर ती कुणाला विचारायाची? आंदोलनावेळी काय करावे काय करू नये याबबत सर्व सूचना या टूलकिटमध्ये दिल्या जातात.

स्वयंसेवकांना, मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या या टूलकिटची मोठी मदत होते. ऑनलाइन अथवा ऑफलाइन सुरू असणाऱ्या कोणत्याही अभियानात एकाच वेळी, एकत्रितपणे एकाच दिशेने काम करण्यास याची मदत होते. टूलकिटमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रेंड तयार करण्यास मोठी मदत होते.ज्या लोकांच्या सहभागामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू शकते वा त्यांची मदत आंदोलनासाठी होऊ शकेल अशा लोकांना टूलकिट शेअर केली जाते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!