Share

उद्योजक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, तूर्तास अटक नाही

Published On: 

मुंबई: अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेल्या आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे असलेल्या बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ‘ईडी’ने चौकशी सुरू केली होती. ईडीच्या परिमंडळ दोनच्या अधिकाऱ्यांनी भोसले यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. तब्बल दहा तास त्यांची ही चौकशी करण्यात आली.

पुण्यातही त्यांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने चौकशी केल्याचे समजते. अविनाश भोसलेंच्या ईडी चौकशीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी झाल्याने राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान ईडीने त्यांच्याकडील काही कागदपत्रांची छाननी सुरू केली होती.

यावेळी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर भोसले यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही रात्री ईडीने ताब्यात घेतले होते. अमित भोसले याला ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे पथक हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेली चौकशी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती

या संदर्भात भोसले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनंतर आता फेमा कायद्याचे उल्लंघन तसेच मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत भोसले यांना अटक न करण्याचे आदेश हायकोर्टाने ईडीला दिले आहेत तसेच चौकशीसाठी 17 फेब्रुवारी रोजी भोसले यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत.

न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. अविनाश भोसले यांच्या वतीने अॅड. शिरीष गुप्ते व अमित भोसले यांच्या वतीने अशोक मुंदर्गी यांनी बाजू मांडली. तर ईडीच्या वतीने हितेन वेनेगावकर यांनी बाजू मांडली. अविनाश भोसले हे तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले. त्यावर याचिकाकर्त्यांनी हा दावा फेटाळून लावला. भोसले हे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असल्याचे वकिलांनी सांगितले. हायकोर्टाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!