🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाची शिवजयंती साजरी करण्याबाबत काही नियमावली आखून दिली आहे यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अनेक राजकीय कार्यक्रम,सभा,मेळावे धुमधडाक्यात होत असताना शिवजयंतीवर निर्बंध घातल्यामुळे ऐन थंडीत पुण्यातील वातावरण तापले आहे.
कोरोना काहीप्रमाणात आटोक्यात आला असल्याचे चित्र असूनही निर्बंध घालण्यात आल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान,काल व्हॅलेंटाइन डे राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने पुणे शहरात अनेक ठिकाणी हॉटेल्स, उद्याने,पर्यटनस्थळे,क्लब, पब, बारसह सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना सांगितले.
कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन सर्वानीच करणे अपेक्षित आहे मात्र असे असतानाही काल नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजी महाराज उद्यान,खडकवासला,सिंहगड आणि आणखी २-४ याठिकाणी मोठी गर्दी झाली होती तसेच अनेक ठिकाणी पार्ट्या देखील आयोजित करण्यात आल्या होत्या.शिवजयंती बाबतच्या आदेशाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना छळण्याचे काम पोलीस करतात मुद्दाम गुन्हे दाखल करतात यावर्षी देखील ते गुन्हे दाखल करतील अशी शक्यता आहे असे देखील शिंदे म्हणाले.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्व नियोजन केल्यावर हे निर्बंध आणणे चुकीचे आहे.कोविडच्या नावावर उगाच दहशत माजविण्याचा प्रकार तर नाही ना असा देखील सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, काही ठिकाणी तर रात्री ३ वाजेपर्यंत या पार्ट्या सुरु होत्या.मास्क आणि गर्दीबाबतचे नियम अक्षरशः पायदळी तुडविल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका बाजूला शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर निर्बंध आणले जात असताना दुसऱ्या बाजूला काल ठिकठिकाणी झालेल्या या गर्दीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले.
सर्वसामान्य शिवभक्त सर्व नियम पाळून शिवजयंती साजरी करण्याची हमी देत असताना त्यांच्यावर निर्बंध का लादले जात आहेत हा सवाल आता उपस्थित होत आहे. व्हॅलेंटाइन डे राज्यात उत्साहात साजरा होतो मात्र शिवजयंतीवर निर्बंध लादले जात असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. IPS अधिकारी अमिताभ गुप्ता सध्या पुण्याचे पोलीस आहेत. त्यांच्याकडून पुणेकरांना मोठ्या अपेक्षा देखील आहेत. त्यांच्याकडून आणखी कठोरपणे नियमांचे पालन करवून घेतले जाईल अशी आशा असताना पोलिसांचे यासर्व प्रकाराकडे दुर्लक्ष तर होत नाही ना ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
राजकीय पक्षांना वेगळे नियम आणि शिवभक्त नागरिकांना वेगळे नियम राज्यात आहेत कि काय असा सवाल आजही उपस्थित होत आहे. राज्यात आता प्रार्थनास्थळे,हॉटेल्स, शाळा,पब,बार,रेल्वे,सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली असताना कोरोनाचे नियम खरेच पाळले जात आहेत का हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल मात्र फक्त शिवजयंतीवर निर्बंध घालून सरकार नेमकं काय सिद्ध करू इच्छिते हा महत्वाचा प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- आदिवासी भिल्ल समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावणार-संदिपान भुमरे
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- पूजा चव्हाण प्रकरणात तपास करणारे पोलीसच दबावात आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
