Share

आता पदव्यूत्तर विभागाचे अभ्यासक्रम एकसमान राहणार

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील अभ्यासक्रम एक समान करण्याचा प्रस्ताव विद्या परिषदेच्या बैठकीत मंजूर केला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता अबाधित ठेवण्यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. विद्यापीठाच्या नाट्यहात सोमवारी सकाळी ११ ते ६ दरम्यान ही बैठक झाली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. सहा तास चाललेल्या या बैठकीत ७४ (ऐनवेळच्या चार विषयांसह) प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेतले. विद्यापीठाच्या औरंगाबाद परिसर, उस्मानाबाद उपपरिसर येथील अभ्यासक्रम, संलग्नित महाविद्यालयातील पदव्यूत्तर विभागाचे अभ्यासक्रम एक समान करण्याचा प्रस्ताव यावेळी मंजूर केले.

२०२१ – २२ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येईल, हे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केले. अशा पद्धतीचा निर्णय घेत असताना विद्यापीठातील विभागांना दिलेली आहेत. स्वायत्तता कायम ठेवण्यात येणार आहे. यावेळी दोन समित्यांची स्थापना केली. व्होकेशनल स्टडीज अभ्यासक्रम संदर्भात प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. तर महाविद्यालयाच्या संलिग्नकरण्यासंदर्भात नियमावली करण्यासाठी डॉ.विलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. दिवसभर विविध ७४ विषयावर चर्चा केली.

मंजूर झालेले महत्वपूर्ण ठराव

मार्च – एप्रिल २०२१ मध्ये होणाऱ्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होतील. या संदर्भात परीक्षा मंडळाच्या मंगळवारी (दि. १६) होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. विद्यापीठास नवीन महाविद्यालयांना संलग्नित देण्यासंदर्भात कडक नियमावली करण्यात येणार, डॉ. विलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. दिवसभराच्या बैठकीत विविध प्रस्तावावर चर्चा केली. या बैठकीसाठी उपकुलसचिव डॉ. आय. आर. मंझा, डॉ. दिगंबर नेटके, कक्षाधिकारी व्यंकट खैरनार, डॉ. पंजाब पडूळ, कैलास त्रिभूवन, जयश्री भोसले, जय देशमाने आदींनी प्रयत्न केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!