लखनऊ : उत्तरप्रदेशची जबाबदारी स्विकारून गलितगात्र झालेल्या पक्ष संघटनेलाऑक्सीजन देण्यात गुंतलेल्या कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीच २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, पंतप्रधान मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला जाऊ शकतात, मात्र दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आणि त्यांना आंदोलनजीवी-परजीवी म्हटले. मोदी देशभक्त आणि देशद्रोहींमधील फरक ओळखू शकले नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
‘जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा निवडणून दिले. कारण जनतेला त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या. मोदी वारंवार रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी बोलले, मात्र त्यांच्या हिताच्या कोणत्याच गोष्टी घडताना दिसत नाही.’ असे देखील त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील शेतकरी महापंचायतीला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘२०१७ पासून येथे उसाचे दर वाढलेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्यांची थकबाकी अद्याप दिली नाही, मात्र स्वत: साठी १६ हजार कोटींचे विमान खरेदी केले.’ नवीन कृषी कायद्यांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ‘मोदी सरकारच्या या नवीन कायद्याचा फायदा फक्त उद्योगपतींनाच होणार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- बायको खर्रा खाते म्हणून घटस्फोट घेता येत नाही, कोर्टाचा निर्वाळा
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

