Share

गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक वरद गणेश मंदिरातील गणपती बाप्पाची मुर्ती सोमवारी सुवर्ण सिंहासनावर आरुढ झाली आहे. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या सुवर्ण सिंहासनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात सुवर्ण सिंहासनाचा लोकार्पण सोहळा गणेश जंयतीच्या मुहूर्तावर पार पडला.

वरद गणेश मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी दुपारी १२ वाजता ढोल-ताशाच्या गजरात गणेशाला ४० किलो चांदी आणि सव्वा किलो सोन्याचे सिंहासन चढवण्यात आले. सुवर्ण सिंहासन लोकार्पणप्रसंगी ते वरद गणेश सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्याक्रमाात बोलताना सखाराम महाराज अमळनेरकर यांनी गणेश सभेचे कौतुक केले. गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पाला सुवर्ण सिंहासनावर आरूढ करण्यात आले. यानिमीत्ताने समर्थनगर येथील वरद गणेश मंदिराने आदर्श परंपरा निर्माण केली आहे.

पुण्याच्या दीपक विश्वकर्मा व ओंकार माने या कारागिरांनी अडीच महिने श्रम करून ४० किलो चांदी आणि सव्वा किलो सोन्याचा वापर करून तयार केलेले सिंहासन पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अनेकांना मूर्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. या वेळी गणेश सभेतर्फे कारागीर, कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला. यात घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी गणेश सभेचे अध्यक्ष मनोज पाडळकर, सुनील केचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!