मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७६ वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.
अशा सेलिब्रिटींवर सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. तसेच अनेक नेते मांडली देखील यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. “समाजातील सेलिब्रिटींना कृषी क्षेत्राविषयी काहीच समजत नाही. याचा अर्थ त्यांनी कोणाच्यातरी दबावाखाली ही ट्विटस केली असावीत,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. आणि त्यांनी देखी आता तोंडसुख घेतल आहे.
मलिक सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या बाजूने सेलिब्रिटींकडून करण्यात आलेल्या ट्विटविषयी नाराजी व्यक्त केली. सेलिब्रिटींनी अशी ट्विटस करायला नव्हती पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारलाही लक्ष्य केले. कायद्यात बदल किंवा सुधारणा करायच्या असतील तर सर्वांना विश्वासात घ्यावे. मॉडेल अॅक्ट आणि आताचा कृषी कायदा यामध्ये फरक आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये नाराज भाजप नगरसेवक अजितदादांच्या भेटीला; राजकीय भूकंपाची शक्यता !
- ‘अमित शाहांच्या कार्यक्रमात दोन गुंड स्टेजवर एकत्र होते’
- कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला दुध डेअरी चालकाची शिवीगाळ,गुन्हा दाखल
- प्रदेशाध्यक्ष होताच नाना पटोलेंना मोठा धक्का, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने सोपवला राजीनामा !
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोनिका राजळे बिनविरोध


