Share

अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोनिका राजळे बिनविरोध

Published On: 

अहमदनगर:- यंदा कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. ह्या निवडणुकीसाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या राजकारणात राधाकृष्ण विखे हे एकाकी पडले आहेत. आता भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सातवड येथील सेवा सोसायटीच्या संचालक मथुराबाई संभाजी वाघ यांनीही अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सोमवारी (दि.८) मथुराबाई वाघ यांनी अर्ज मागे घेतल्याने आमदार राजळे यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. वाघ या विखे गटाच्या समर्थक आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!