Share

पिंपरी-चिंचवडमध्ये नाराज भाजप नगरसेवक अजितदादांच्या भेटीला; राजकीय भूकंपाची शक्यता !

Published On: 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१४ मध्ये राज्यासह देशात भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकांआधी अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता.

या नगरसेवकांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. यामुळेच राष्ट्रवादीचा खासकरून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपने सत्तेचा झेंडा फडकावला. आता महापालिकेच्या निवडणूक जवळ आल्या असतानाच भाजपमधील नगरसेवकांचा नाराजीचा सूर वाढला आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला तब्बल ७७ तर राष्ट्रवादीला केवळ ३६ जागांवर यश मिळाले होते. महापालिकेत सद्या भाजपची एकहाती सत्ता आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे अजित पवार हे पुन्हा एकदा जास्त जोराने या भागात कामाला लागले आहेत. भाजपमधील नाराज नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे येत्या काळात शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. पिंपरीतील २५ ते ३० नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांची भेटही घेतली आहे. यामुळे भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!