मालेगाव : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. अनेक तर्क-वितर्क अनेक लोकांकडून केले जात होते. परंतु या सर्व गोष्टींवर मात करून नाना पटोले यांनी बाजी जिंकली आणि अखेर ते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष होताच नाना पटोलेंना मोठा धक्का बसलेला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं. मात्र हीच काँग्रेस राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसमधील गळती थांबली. तसंच आता इतर पक्षांमधून कार्यकर्ते आपल्याकडे येतील, असा दावाही काही काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. मात्र काँग्रेसच्या याच स्वप्नांना धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रांतिक सदस्य असिफ शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रांतिक सदस्य असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे. असिफ शेख यांनी पक्ष सोडण्याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात असून आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, असिफ शेख यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असतानाच आणखी एका चर्चेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतच असिफ शेख प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे. त्यामुळे शेख यांच्या प्रवेशावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतही संघर्ष निर्माण होऊ शकतो. आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला दुध डेअरी चालकाची शिवीगाळ,गुन्हा दाखल
- ‘जालियानवाला बाग आंदोलनामुळे इंग्रजांना कायदा मागे घ्यावा लागला होता, याचीच पुनरावृत्ती होतीये’
- उस्मानाबादच्या विकासाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष, आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा आरोप
- ‘पवारांवरील आरोप हा मोदींनी स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला प्रयत्न’
- बातम्यांमध्ये झळकण्यासाठी साहेबांवर टीका केली जाते : अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

