नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
या कार्यक्रमावेळी भाषण करताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. उद्धव ठाकरे हे खोटं बोलले आहेत. राज्यातील जनतेने भाजपला सर्वाधिक पसंत केलं आहे.’
‘शिवसेनेनं देखील निवडणुकांवेळी बॅनरवर नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करून फडणवीसांच्या नेतृत्वात मतं मागितली. यानंतर, त्यांनी पवित्र जनादेशाचा अनादर करून अपवित्र गठबंधन केलं. कुटील राजकारण यावेळी करण्यात आलं. आम्ही तुमच्या मार्गाने नाही चाललो. देवेंद्रभाई मुख्यमंत्री असताना त्याच मार्गाने आम्ही चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्वच राहिलं नसतं. आम्ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र कल्याणाच्या मार्गाने चालतो,’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला फटकारलं होते.
दरम्यान, यावर शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी भाष्य केले आहे. ‘शिवसेनेची शिडी घेऊन महाराष्ट्रात भाजप उभी राहीली. वाटाघाटी झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली होती. पण सरकार आल्यानंतर मंत्रिपदाचे वाटप करताना आमची अवेहेलना केली. शिडी दूर गेल्यामुळेच सत्तेतून दूर गेलात’, असा टोलाही सावंत यांनी भाजपला लगावला. अमित शाहांच्या कार्यक्रमात दोन गुंड स्टेजवर एकत्र होते’, असे म्हणत सावंत यांनी फडणवीस यांच्यासह राणेंवर घणाघात केला आहे. याबाबत झी २४ तास वाहिनीने वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांवरील आरोप हा मोदींनी स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला प्रयत्न’
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार – रामदास आठवले
- ‘जालियानवाला बाग आंदोलनामुळे इंग्रजांना कायदा मागे घ्यावा लागला होता, याचीच पुनरावृत्ती होतीये’
- गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्रिपदी पाहायचे स्वप्न अधुरेच, धनंजय मुंडे भावुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

