Share

कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला दुध डेअरी चालकाची शिवीगाळ,गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : राज्यात प्लास्टिकबंदी असूनही शहरात खुलेआम पणे प्लास्टिक बाळगले जाते. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवायांचे सत्र सुरूच आहे.यासोबतच रस्त्यावर थुंकणे,कचरा टाकणे, बायोवेस्ट,प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरोधात देखील दंड आकारणे सुरु आहे. महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्लास्टिक विरोधी मोहिम तीव्र केली होती.

याच पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यां विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या बाळगून विक्री करणाऱ्यांवर महापालिकेने धडक कारवाई करावी असे निर्देश औरंगाबाद प्रशासकांनी दिले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या पथकास विरोध होताना दिसत आहे.

सोमवारी (दि.८) चेलीपुरा भागात कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिटी चौंक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तुकाराम मिसळ (वय ४३) असे स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे. शासनाने ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यावर बंदी घातली आहे.

असे असतानाही चेलीपुरा भागातील सागर दुध डेअरी येथे चालक अझहर कुरेशी यांचाकडे प्रतिबंधीत प्लास्टिकचा प्लास्टिक होत असल्याचे मनपाला दिसून आले. याठिकाणी पथकाने साडेतीन किलो प्लास्टिक जप्त केले. स्वच्छता निरीक्षक मिसाळयाने चालक कुरेशीला दंडाची पावती दिली.मात्र कुरेशीने पथकाला धमकावत दंडाची पावती घेण्यास नकार दिला. या प्रकरणी सिटी चौंक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!