मुंबई: देशभरात सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. यावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधत अनेक सवाल केले आहेत. पाकच्या ताब्यातील कश्मीर सोडविण्यासाठी मोदी सरकारला कठोर पाऊले उचलावी लागतील. त्यातले पहिले पाऊल ते कधी टाकणार? असा सवाल संजय राऊत (sanjay raut ) यांनी केला आहे.
पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेण्याआधी सरकारला हिंदुस्थानी कश्मीरातील बऱ्याच गोष्टी स्थिरस्थावर कराव्या लागतील. आपल्या कश्मीरात आजही अशांतता व तणाव आहे. 370 कलम हटवले हे खरे. पण त्यानंतर एकही नवा उद्योग कश्मीरात आला नाही , गुंतवणूक झाली नाही व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे कश्मीरातील तरुणांत असंतोष आहे. हजारो कश्मिरी पंडितांच्या ‘घर वापसी’चा संकल्प मोदी यांनी सात वर्षांपूर्वी सोडला होता. तो अपूर्णच आहे. आपल्या पंडितांना आपल्याच कश्मीरात स्थिरस्थावर करता आलेले नाही, तेव्हा पाकव्याप्त कश्मीरचे नवे प्रश्न कसे सोडविणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ , ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटांचा प्रचार करून इथले खरे प्रश्न सोडविता येणार नाहीत. कश्मिरी पंडितांसाठी असलेल्या पुनर्वसन व घरकुल योजनाही मोदी सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. सात वर्षांत फक्त 17 टक्के कश्मिरी पंडितांना घरे मिळाली हे धक्कादायक आहे. पाकडय़ा अतिरेक्यांनी पंडितांचे बळी घेतले, पण निर्वासित , बेघर , बेरोजगार पंडितांसाठी राजकीय अश्रू ढाळणाऱ्यांनी काय केले? असा संतप्त सवाल अंजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…साकारण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच, पण तो पूर्णत्वास कसा नेणार?”, संजय राऊतांचा सवाल
- IPL 2022: मुंबईच्या पलटनसाठी मोठी बातमी; सूर्या पहिले काही सामने मुकणार!
- IPL 2022 : अरेरे..! स्पर्धेबाहेर गेलेल्या जेसन रॉयला मिळाली जबर शिक्षा!
- शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! शिवसंपर्क अभियानापूर्वी वर्ध्यातील विश्रामगृहात राडा
- “… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”- रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

