Share

IPL 2022: मुंबईच्या पलटनसाठी मोठी बातमी; सूर्या पहिले काही सामने मुकणार!

Published On: 

मुंबई: सूर्यकुमार यादव मागील काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग लाईनपचा कणा बनला आहे. आता मात्र स्पर्धा सुरु होण्याआधी मुंबईला मोठा धक्का लागला आहे. सूर्या सुरुवातीचे काही सामने मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचे कारण म्हणजे तो अजूनही बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून रिकव्हर होत आहे.

सूर्यकुमारला (suryakumar yadav) गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या अंतिम T20I दरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो त्याच्या रिकव्हरीसाठी बंगळुरूला गेला. त्याला अद्याप NCA द्वारे सोडण्यात आलेले नाही. ज्यामुळे त्याला मुंबई सोबत जुळायला अजून काही काळ लागेल आणि तो सुरुवातीचे सामने मुकणार आहे.

मुंबई इंडियन्स (MI) मागच्या वर्षी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नसली तरीही सूर्या गेल्या मोसमात दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. २०१९ पासून मुंबईकर झालेल्या सूर्यामुळे मुंबईच्या फलंदाजीत अजून बळ आले. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमुळे फलंदाजीच्या क्रमवारीत मोठी पोकळी पडणार आहे. यावर्षी एमआयने रिटेन केलेल्या चार खेळाडूंपैकी तो एक होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!