वर्धा : शिवसंपर्क अभियानापूर्वी शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय. वर्ध्याच्या स्थानिक विश्राम गृहात शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुख बसले असता तोडफोड झाली. शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी तोडफोड केली असल्याचे समोर आले.
विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत वाद झाल्याची माहिती आहे. मुंबई येथील शिवसंपर्क अभियानासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला आहे. विश्रामगृहाच्या कावेरी या खोलीत जाऊन टेबलाची तोडफोड करण्यात आली. आजपासून शिवसंपर्क अभियान सुरू झाले. खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या संपर्काची जबाबदारी देण्यात आली आहे. तुमाने दौऱ्यावर येण्यापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आले असता हा वाद झाला.
शिवसेनेच्या वतीने 22 ते 25 मार्च या कालावधीत शिवसेना संपर्क मोहीम हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी येथील विश्रामगृहात मुंबई येथून शिवसेना संपर्क प्रमुख आणि काही पदाधिकारी दाखल झाले होते. पण शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे हे आपल्या कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात दाखल झाले. त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी बाचाबाची करुन शाब्दिक वाद करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

