Share

IPL 2022 : अरेरे..! स्पर्धेबाहेर गेलेल्या जेसन रॉयला मिळाली जबर शिक्षा!

Published On: 

मुंबई: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघात निवडल्या गेलेल्या जेसन रॉयने काही दिवसांपूर्वी स्पर्धेतून माघार घेतली होती. यानंतर आता त्याच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. रॉयवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्याने बायो बबलचा हवाला देत लीगच्या १५ व्या हंगामातून माघार घेतली होती. बंदी लादण्याबरोबरच ईसीबीने रॉयवर २,५०० युरोचा दंडही ठोठावला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी एक निवेदन जारी करून सांगितले की, रॉयच्या वाईट वर्तनामुळे त्याच्यावर बंदी आणि दंड ठोठावण्यात आला आहे. “क्रिकेट शिस्तपालन समितीने जेसन रॉयच्या विरोधात निकाल दिला. जेसनने (jason roy) आपल्यावरील आरोपांची कबुली दिली आहे की त्याने जे वर्तन केले, ते करायला नको होते. कारण यामुळे क्रिकेट, ईसीबी आणि स्वतःची बदनामी होते. जेसनने ECB च्या निर्देश ३.३ चे उल्लंघन केले आहे.जेसनला इंग्लंडच्या पुढील दोन सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे. ज्यामध्ये तो निवडीसाठी उपलब्ध असेल. परंतु हे त्याच्या वर्तनावर अवलंबून आहे, निलंबन १२ महिन्यांसाठी देखील असू शकते.”

स्फोटक फलंदाज जेसन रॉय आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणार होता. रॉयला गुजरात संघाने २ कोटी रुपयांना खरेदी केले. पण सलामीवीराने बायो बबलचा हवाला देत १५ व्या सत्रातून आपले नाव मागे घेतले. मात्र ही त्याची माघार घेण्याची पहिली वेळ नाही. याआधीही २०२० च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतल्यानंतर त्याने माघार घेतली होती. त्यावेळीही त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!