Share

‘ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरु आहे. मलिक आणि फडणवीस दोघांनी परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि मलिकांच्या जावयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. तसेच नवाब मलिक यांनीही फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत सणसणीत टोला लगावला आहे. ‘नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत. ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं? असा खोचक सवाल केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या आवाहनाचा दरेकरांनी समाचार घेतला आहे. ‘भावनिक बोलून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहीली आहे. त्यामुळे आम्हाला पोळी भाजण्याची गरज नाही’ असा घणाघाती आरोप दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!