Share

ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ एवढी होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत सध्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीआधारे निश्चित केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहिली. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे.

लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण या बाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधित्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढवण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

दरम्यान, मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपतो आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना एकत्रित लढणार आहेत. तर, कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!