🕒 1 min read
सातारा: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसमावेशक पॅनेल आता रिंगणात उतरले आहे. ‘कप बशी’ या चिन्हावर ते लढणार आहेत. अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काल व्हिडिओ कॉलवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, आमचे 11 संचालक बिनविरोध आले असून उर्वरित संचालकही निवडून येतील. त्यासाठी आमची तयारी सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी पालकमंत्री बाळासाहेब पाटील , आमदार शिवेंद्रसिंहराजे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, नितीन पाटील त्याचबरोबर अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याचदरम्यान रामराजेंनी पॅनेलची घोषणा करत उमेदवारांची नावे सांगितली.
दरम्यान ‘महिला राखीव’च्या उमेदवारीवरून वादावादी झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता ‘असे काहीही झालेले नाही’ असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच कऱ्हाड तालुका मोठा असून माझ्या उमेदवारीचा निर्णय सर्वांच्या विचाराने घेतला आहे. माझ्यासाठी तालुक्याने निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मला निवडणूक लढणे भाग पडले. असे स्पष्टीकरण सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत:च खोदत आहेत; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’


