Share

काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ

Published On: 

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी बुधवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ मुंबईत विधान भवनात घेतली. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी त्यांना सदस्यत्वाची व गोपनीयतेची शपथ दिली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची उपस्थिती होती. यावेळी अंतापूरकर यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाकाळात एप्रिलमध्ये निधन झाले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. यात भाजपचे उमेदवार शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पराभव करत जितेश यांनी बाजी मारली.

जितेश अंतापूरकर यांच्या शपथविधिदरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देगलूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ.जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून सदस्यत्वाची शपथ घेतली. देगलूर-बिलोलीच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने जितेश अंतापूरकर यांना निवडून दिले आहे. ते आपले स्वर्गीय वडील रावसाहेब अंतापूरकर यांचा जनसेवेचा वारसा घेऊन मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहतील, असा मला विश्वास आहे, असे मत थोरात यांनी ट्विट करत व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!