🕒 1 min read
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद त्यांच्या सौम्य हिंदुत्वाच्या अजेंड्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी माझा आम आदमी पक्ष खऱ्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे असा दावा केला आहे.
हनुमान चालीसा म्हणणे पाप आहे का?, प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे पाप आहे का? असा सवाल करत त्यांनी जेव्हा ते असं करतात तेव्हा इतर पक्षाचे लोक त्यांना शिव्या देतात अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी टाइम्स नाऊ नवभारत समिटमध्ये दिली. सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते हिंदुत्व नाही. भगवान श्रीराम हे प्रत्येक हिंदूचे आराध्य दैवत आहेत. माझ्या मते, रामचंद्रांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द, त्यांचे बोलणे, त्यांचे शब्द हे माझ्यासाठी हिंदुत्व आहे. प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि आचरण हेच खरे हिंदुत्व आहे. मला देशातील १३० कोटी लोकांना एकत्र करायचे आहे. मला माणसाला माणसाशी जोडायचे आहे. आणि देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
तसेच धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली करणे आणि दलितांवर अत्याचार करणे हे हिंदुत्व नसून एका माणसाला दुसऱ्या माणसाशी जोडणे म्हणजे हिंदुत्व आहे. आज हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते हिंदुत्व नाही. हे लोक सोशल मीडियावर लोकांना घाणेरड्या शिव्या घालतात, धमक्या देतात, हे हिंदुत्व नाही. असे म्हणत त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत:च खोदत आहेत; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’


