🕒 1 min read
मुंबई: राज्यातील थकबाकीदार कारखान्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, “आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही. जो-तो स्वतःच्या ताकदीवर कारखाना चालवत आहे. अनेक बँका कर्ज दिल्यामुळे आतापर्यंत अडचणीत आल्या होत्या. मात्र, सध्या राज्य सहकारी बँकेचा नफा ३८० कोटींवर गेला आहे.”, यावरून फडणवीस आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा पहावयास मिळाला. आता यावरच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) सवाल केला आहे.
“मागच्या वर्षी ३७ कारखान्यांना हमी दिली त्याचं काय? कारखान्यांना वित्तसंस्था कर्ज देणार नाही हे कळताच शेतकऱ्यांची तडफड होणार आणि या निर्णयाची सर्वात मोठी किंमत शेतकऱ्याला भोगावी लागणार. हमी देताच कामा नये पण त्याचबरोबर शेतकर्यांना त्रास होणार नाही त्यावर अजित पवारांनी बोलावं.”, असे आव्हान निलेश राणे यांनी ट्वीट करत दिले आहे.
मागच्या वर्षी ३७ कारखान्यांना हमी दिली त्याचं काय?? कारखान्यांना वित्तसंस्था कर्ज देणार नाही हे कळताच शेतकऱ्यांची तडफड होणार आणि या निर्णयाची सर्वात मोठी किंमत शेतकऱ्याला भोगावी लागणार. हमी देताच कामा नये पण त्याचबरोबर शेतकर्यांना त्रास होणार नाही त्यावर अजित पवारांनी बोलावं. https://t.co/a4P9wvdqqI
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 16, 2022
दरम्यान अण्णा हजारे यांनी ४९ साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून थेट केंद्राकडे चौकशीची मागणी केली होती. अमित शहा यांच्याकडे या खात्याचा कारभार आल्यानंतर पवारांशी संबंधित कारखान्याचीच चौकशी सध्या ईडीमार्फत सुरू आहे. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई पोलिसांवर ‘पुष्पा’ फिवर; श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट पेरफॉर्मन्स
- १२-१४ वयोगटाच्या लसीकरणास आजपासून सुरुवात; अनेक ठिकाणी मुलांचा चांगला प्रतिसाद
- मनसेचा दणका; कार्यकर्त्यांकडून IPL साठी आणलेल्या बसेसची तोडफोड
- “चित्रपट आणि जीओ ची जाहिरात करून पंतप्रधान सेल्समन झाले असतील तर…”, सचिन सावंत यांचा टोला
- IPL 2022: टीम इंडियानंतर रोहित इंडियन्स संघात दाखल ; मुलगी समायरासह व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
