Share

IPL 2022: टीम इंडियानंतर रोहित इंडियन्स संघात दाखल ; मुलगी समायरासह व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे दोन दिग्गज खेळाडू थेट संघात दाखल झाले आहेत. भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. ज्यामध्ये भारताने पाहुण्या संघाचा २-० असा पराभव केला. आता २६ मार्चपासून आयपीएलही सुरू होणार आहे. ज्यासाठी खेळाडूंनाही तयारी करावी लागते. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सोमवारी रात्री उशिराच IPL 2022 च्या १५ व्या हंगामासाठी मुंबई संघात सामील झाले आहेत.

मुंबई इंडियन्सचा ( mumbai indians) कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) आणि जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) कसोटी मालिका जिंकल्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूहून ट्रायडंट बीकेसी येथे पोहोचले. या दोन्ही खेळाडूंना आयसोलेशनच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यानंतर टीमचा बायो बबलशी जोडला जाईल. त्याचवेळी टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायराला कडेवर घेऊन जिंकलेल्या ट्रॉफीज दाखवत आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1503591433583824901?s=20&t=MW8MP6OnGCBV6eObSsfXPA

मुंबई इंडियन्स संघ पाच वेळा विजेता आहे आणि तो २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळेल. हा सामना सीसीआय ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघाची लढत अटीतटीची होताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!