🕒 1 min read
मुंबई: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आत्ताच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर या अगोदर ते जिओ च्या जाहिराती मध्येही झळकून आले होते. यावरूनच सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मोदींवर टीका केली आहे.
“चित्रपटाची आणि जीओ ची जाहिरात जर पंतप्रधान स्वतः करत असतील व सेल्समन झाले असतील तीथे ग्राहकांनी सुजाण आणि सजग होणे खरंच गरजेचे आहे. आपले अधिकार जाणून घेण्याचा भाजपचा हा संदेश चांगले मतदार होण्यासाठी ही आवश्यक आहे.”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. सोबतच त्यांनी भाजपने केलेली ‘ग्राहक हक्क दिन’ ची जाहिरातही शेअर केली आहे.
चित्रपटाची आणि जीओ ची जाहिरात जर पंतप्रधान स्वतः करत असतील व सेल्समन झाले असतील तीथे ग्राहकांनी सुजाण आणि सजग होणे खरंच गरजेचे आहे.
आपले अधिकार जाणून घेण्याचा भाजपाचा हा संदेश चांगले मतदार होण्यासाठी ही आवश्यक आहे. ???? https://t.co/6E6gnE3IfV— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 16, 2022
दरम्यान मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली आहे. यावेळी मोदी म्हणाले की, ‘चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते. सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत.’
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: टीम इंडियानंतर रोहित इंडियन्स संघात दाखल ; मुलगी समायरासह व्हिडीओ व्हायरल
- “काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा ‘हिजाब’ दूर करायला हवा”, संजय राऊतांचा सल्ला
- वासिम जाफरने केले रोहित शर्माचे कौतुक; म्हणाला “विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार…”
- IPL 2022: अजित आगरकरचा ‘या’ आयपीएल फ्रँचाइसीबाबत खुलासा; म्हणाला “सगळे त्यांच्यावर हसत…”
- ‘तेव्हा आम्ही बघूच की कोण आयपीएल खेळायला जातो’ ; पीएसएलमध्ये मोठा बदल आणण्याचे रमीज राजांचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
