मुंबई : मागच्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. तिच्या खासगी आयुष्यामुळेच ती कायम चर्चेत आली. आता देखील समांथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
नुकतंच कॉफी विथ करणच्या ७ व्या पर्वात समांथाने हजेरी लावली. यावेळीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी करण जोहरने समांथाला नागाचैतन्यसोबत घटस्फोट घेण्यावरून एक प्रश्न विचारला. त्यावेळी ती म्हणाली, “माझ्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभवांचे सर्वात मोठे कारण तुम्हीच आहात. लग्न हे ‘कभी खुशी कभी गम’ सारखे असते हे तुम्ही चित्रपटांमध्ये दाखवले आहे. मात्र ते खऱ्या आयुष्यात KGF सारखे आहे आणि त्यामुळे सगळेच नाराज आहेत.”
https://www.instagram.com/p/Cen7ytZr6Yj/
दरम्यान, समांथा आणि नागाचैतन्य या दोघांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्न केले होते. नंतर त्यांनी ४ वर्षानंतर घटस्फोट घेतला. यावरून तिला खुप मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले. त्यानंतर ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँगमुळे ती चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या :


