Share

“आता सहन होत नाही…”; ममता बँनर्जींनी राज्यपालांना केले ब्लॉक

Published On: 

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जीं आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वाद जगजाहीर आहे. पण आता या वादाला एक नवीन वळण मिळाले आहे. ममता बँनर्जींनीं राज्यपालांना चक्क ट्वीटरवर ब्लॉक केले आहे. एका प्रेस कॉन्फरंसमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ममता बँनर्जीं म्हणाल्या की, राज्यपाल सतत ट्वीटरवरून त्यांच्यावर हल्ला आणि आरोप करत असतात. जणू काही राज्यपाल हे मालक आहेत आणि आम्ही त्यांचे वेठबिगार. मला आता हे सहन होत नाहीये, म्हणून मी त्यांना ब्लॉक केले आहे.

मुख्यमंत्री बँनर्जींनीं राज्यपालांवर राज्याचे चीफ सेक्रेटरी आणि पोलीस महानिर्देशकांना धमकी देण्याचा आरोप केला आहे. गेल्या एक वर्षापासून त्या या त्रासाला सहन करत आहेत आणि त्यांच्या अनेक फाईली राज्यपालांकडे अडकून आहेत, असे ही त्या म्हणाल्या. या संबंधित मी पंतप्रधान मोदींना सुद्धा पत्र लिहिले आहे, अशी माहिती त्यांनी या परिषदेत दिली. तर तृणमूल कॉंग्रेसचे खासदार संदीप बंद्योपध्याय यांनी सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे बंगालच्या राज्यपालांना बदलण्याची मागणी केली आहे. त्यावेळी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू देखील तिथे उपस्थित होते.

पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, पर्यायने राज्य सरकार, यांच्यातील हा वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. गणतंत्र दिनाच्या दिवशी सुद्धा ते एकमेकांना टाळताना दिसले. तर त्यांचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे जगदीप धनखड राज्यपाल झाल्यापासून सुरु आहे. जगदीप धनखड़ हे जुलै २०१९ पासून बंगालचे राज्यपाल आहेत. बंगालच्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसेनंतर या वादाला तीव्र स्वरुप मिळाले आहे. केंद्रातील भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांचा विरोधी पक्ष्याच्या राज्य सरकारांबरोबर सतत वाद होत असतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा वादाच्या ठिणग्या पडत असतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!