मुंबई: कोणी कोणता व्यवसाय करावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाने आजपर्यंत एक दमडीचा व्यवसाय केला नाही, असं असताना अशोक गर्ग यांनी तुम्हाला पार्टनरशीप दिली कशी? याच उत्तर द्या, असा प्रश्न किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना केला आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा चणे, शेंगदाणे विकतो का?, भाजपवाल्यांची (BJP) मुले केळी विकतात का?, अमित शहांचा (amit shah) मुलगा ढोकळा विकतो का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांना केला होता. त्यावर सोमय्यांनी देखील राऊतांवर पलटवार करत काही प्रश्न केले आहेत.
राऊत कुटुंबाचा कोणत्याही व्यवसायाशी कोणता ही थेट संबंध नाही, असे असताना अशोक गर्ग तुम्हाला पार्टनरशीप देतात कशी? ही सेटलमेंट उद्धव ठाकरेंनी घडवून आणली का? पडद्यामागे नक्की काय चाललाय. वाईन उद्योगात १०० कोटींची उलाढाल होते, त्याचे लाभार्थी कोण? असे खोचक सवाल सोमय्या यांनी राऊतांना केले आहेत.
यावेळी सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर दहिसरच्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी हल्ला केला. या सेंटरमध्ये एकही रुग्ण आला नाही, तरी पण इथे लाखोंचा खर्च झाला आहे. असा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्याच बरोबर सीताराम कुंटे यांनी दिलेल्या जबाबानंतर उद्धव ठाकरे यांची बोलती बंद झाली आहे. या प्रकरणावर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी देखील सोमय्यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने वॉर्डांची संख्या वाढवली आहे. वॉर्डांची संख्याच वाढवायची होती तर चार महिन्यांपूर्वीच वाढवायची होती. मुंबईत शिवसेना साफ होणार यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला आहे. महाविकासआघाडी सरकार हे वसुली सरकार आहे आणि मातोश्रीवरून वसुली सुरु होणार आहे. त्यासाठीच कंत्राटदार निवडायचे आहेत, असे सोमय्या मुंबईच्या वाढवलेल्या वॉर्डांबाबत प्रतिक्रिया देताना सोमय्या बोलले.
महत्वाच्या बातम्या:
“…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
“नथुराम गोडसेची विचारधारा…” ; तुषार गांधींची वेदनादायक प्रतिक्रिया
“शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्याची देखील परवानगी द्यावी”, भाजप खासदाराचा संताप


