Share

“आम्ही विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी तयार”, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : आज(३१ जाने.) अचानकपणे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसह शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूरसह अनेक शहरात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले असून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज प्रमाणे हिंदुस्तानी भाऊ नावाच्या युट्युबरचे व्हिडिओ पाहून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आम्ही विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,‘दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.’ तसेच या प्रकरणाची चौकशी करू आणि विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा कोण आहे, त्याचा शोध घेऊ, असे शिक्षणमंत्री म्हणाल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने बारावीची परीक्षा ४ मार्च ३० मार्च दरम्यान घेण्याचे ठरवले आहे. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होऊ शकत नसल्याचे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी नसल्याने ऑनलाइन माध्यमातून परीक्षा घेण्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!