पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन नव्या वादाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला असून या भूमिकेवरून त्यांच्यावर सर्वच स्तराहून टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल(३० जाने.) अमोल कोल्हे यांनी आळंदी येथील गांधींच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली. तसेच महात्मा गांधींच्या हत्येचे मी व्यक्तिशः कधीही समर्थन केलेले नाही,करणारही नाही, असेही ते म्हणाले.
यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘चित्रपटात नथुरामची भूमिका केली, पण त्या विचारधारेचे मी कदापि समर्थन करणार नाही. अशा क्षुल्लक गोष्टीने महात्मा गांधींचे विचार कधीही पुसले जाणार नाही’, असे कोल्हे म्हणाले.
महात्मा गांधींच्या हत्येचे मी व्यक्तिशः कधीही समर्थन केलेले नाही,करणारही नाही.त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली. pic.twitter.com/3FiImO5SOl
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 29, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘या निमित्ताने आजच्या तरुणाईमध्ये महात्मा गांधींबद्दल असलेली आस्था, निष्ठा बघून मला खूपच आनंद झाला. महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्वच यातून सिद्ध होते. सत्य, अहिंसा आणि क्षमाशीलतेचा त्यांनी जगाला दिलेला विचार संपूर्ण मानवजातीसाठी मोलाचा आहे.’ तसेच मीही त्या विचारांचा पाईक आहे, असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
पुत्रशोक झालेला आमदार ‘बाप’ गडकरींसमोर ढसाढसा रडला; वाचा पुढं काय झालं!
“केवळ महसुलासाठी मद्य विक्रीला प्राधान्य देणे हे जनतेचं दुर्दैव”, अण्णांनी साधला ‘मविआ’वर निशाणा
“…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
“…मग आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल


