🕒 1 min read
ठाणे: नरेंद्र मोदी, कांदे आणि बटाटयाचे भाव कमी करण्याकरिता पंतप्रधान झाले नाहीत. लोक त्याच दृष्टीकोणातून त्यांच्याकडे पहातात. ते अगोदर बदलले पाहिजे. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी भिवंडीत एका कार्यक्रमात बोलताना केले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली २०२४ सालापर्यंत पाकिस्तानने (Pakistan) गिळंकृत केलेला काश्मीरचा (Kashmir) भाग भारतात असेल अशी आशा सुद्धा व्यक्त केली.
२०२४ मध्ये काहीतरी चांगले होण्याचे संकेत आहेत. पाकयुक्त काश्मीर भारताचा भाग होईल, आणि नरेंद्र मोदीच हे करून दाखवतील असे देखील ते म्हणाले. पण त्यागोदार आपण आपली त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलली पाहिजे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाच (Amit Shah) देशासाठी महत्वाच्या गोष्टी करू शकतात, महत्वाचे निर्णय घेऊ शकतात. कलम ३७० रद्द करणे, (Article 370) नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आदी महत्वाचे निर्णय घेतल्याने त्यानीच पुढे या देशाचे नेतृत्व करावे असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- हिम्मत असेल तर औरंगाबादेत वाईन विक्री करूनच दाखवा; इम्तियाज जलील यांचा ठाकरे सरकारला इशारा!
- अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश; म्हणाले, ‘कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या…’
- “…मग आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- “…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण यांना ‘गोडसे-आपटे भारतरत्न’ पुरस्कार; हिंदू महासभेनं केलं सन्मानित!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
