मुंबई : आज(३१ जाने.) अचानकपणे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसह शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूरसह अनेक शहरात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले असून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज प्रमाणे हिंदुस्तानी भाऊ नावाच्या युट्युबरचे व्हिडिओ पाहून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी विद्यार्थी आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बच्चू कडू म्हणाले की,‘काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे, सर्व विद्यार्थ्यांचं असंच मत आहे असं म्हणता येणार नाही. ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही, त्या लोकांचाही या आंदोलनात सहभाग असल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? आंदोलनाचं आयोजन कुणी केलं? याची चौकशी केली जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी आम्ही योग्य निर्णय घेऊ.’ तसेच तसेच हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहितीही यावेळी बच्चू कडू यांनी दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.’ तसेच या प्रकरणाची चौकशी करू आणि विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा कोण आहे, त्याचा शोध घेऊ, असे शिक्षणमंत्री म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
‘हिंदुस्थानी भाऊ’ च्या अफवेनंतर विद्यार्थी आक्रमक; राज्यभर आंदोलन
“राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”, संजय राऊतांचे आव्हान
SSC-HSC UPDATE: दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या; मराठवाड्यातील विद्यार्थी आक्रमक..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

