मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. दिल्लीतही त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे. आपल्या पक्षाला पुढे नेत, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सुकाणू समितीमध्ये इतर राज्यातील नेत्यांचा समावेश करता येईल.
उद्या १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी ३ वाजता शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्याच सोबत त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष (Kunal Ghosh) यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली होती. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असेही कुणाल घोष म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- राऊतांसोबतच्या व्हायरल डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- …हे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? भातखळकरांचा टोला
- आ देखें ज़रा किसमें कितना है दम!; मलिकांचे दरेकरांना आव्हान
- ‘हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं’
- दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला; नीलेश राणेंवर राष्ट्रवादीची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

